मुंबई दि. 26, प्रतिनिधी :
चेंबूरच्या इतिहासात प्रथम आयोजित केलेल्या `चेंबूर महामॅरेथॉन', स्पर्धकांच्या प्रचंड प्रतिसादाने यशस्वीरित्या संपन्न झाली. स्पर्धेचे
आयोजन डॉ. बच्चूभाई अर्जुन चौहाण स्पोर्टस् ऍकेडेमी व महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा विभागाच्या जिल्हा क्रीडा परिषद, मुंबई
उपनगरे यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते. डॉ. बच्चूभाई अर्जुन चौहाण स्पोर्टस् ऍकेडेमीचे अध्यक्ष अनिल चौहान यांनी
ध्वज दाखवून या महामॅरेथॉनचा शुभारंभ केला. सुमारे 3000 हजार स्पर्धकांनी या मॅरेथॉनमध्ये भाग घेतला. सकाळी 7 वाजता
मॅरेथॉनला सुरुवात झाली. सुमारे 7 किलो मिटरची ही मॅरेथॉन होती.
पारितोषीक वितरण समारंभाला ऍकेडेमीचे अध्यक्ष अनिल बच्चूभाई चौहाण, दै. मुंबई मित्रचे संपादक, अभिजीत राणे,
ऍकेडेमीचे खजिनदार दीपक चौहाण, सचिव महेंद्र चेंबूरकर, आचार्य कॉलेजचे रमेश म्हापणकर, सुबोध आचार्य, राजश्री पालांडे,
किसन कदम, ललिता वासन व अन्य मान्यवर उपस्थित होत़े
वरिष्ट नागरीक (पुरुष) गटात एकनाथ पाटील पहिले आले यांना रोख रक्कम 5000, स्मृती चिन्ह, सुवर्ण पदक व प्रमाण
पत्र देण्यात आले, द्वितीय क्र. गंगाराम पाटील यांनी पटकाविले. त्यांना 3000 रोख, स्मृती चिन्ह, रौप्य पदक व प्रमाण पत्र
देण्यात आले, तृतीय कमलाकर पवार यांनी पटकाविले. त्यांना 2000, रोख, स्मृती चिन्ह, कास्य पदक व प्रमाण पत्र देण्यात
आल़े
10-15 (मुली) प्रथम क्र. अभिरामी प्रसन्न यांनी पटकाविले. त्यांना रोख रक्कम 5000, स्मृती चिन्ह, सुवर्ण पदक व प्रमाण
पत्र देण्यात आले, द्वितीय क्र. साक्षी मिश्रा यांनी पटकाविले. त्यांना 3000, रोख, स्मृती चिन्ह, रौप्य पदक व प्रमाण पत्र देण्यात
आले, तृतीय क्र. मनाली कोहाले; यांनी पटकाविले. त्यांना 2000, रोख, स्मृती चिन्ह, कास्य पदक व प्रमाण पत्र देण्यात आल़े
10-15 (मुले) प्रथम क्र. पिंटू खंडू गायकर यांनी पटकाविले. त्यांना रोख रक्कम 5000, स्मृती चिन्ह, सुवर्ण पदक व प्रमाण
पत्र देण्यात आले, द्वितीय क्र. मनोज पनन्नलाल गुप्ता यांनी पटकाविले. त्यांना 3000, रोख, स्मृती चिन्ह, रौप्य पदक व प्रमाण
पत्र देण्यात आले, तृतीय क्र. राहुल नंदलाल यादव; यांनी पटकाविले. त्यांना 2000, रोख, स्मृती चिन्ह, कास्य पदक व प्रमाण
पत्र देण्यात आल़े
16-19 (मुली) प्रथम क्र. श्रुष्टी देशपांडे यांनी पटकाविले. त्यांना रोख रक्कम 5000, स्मृती चिन्ह, सुवर्ण पदक व प्रमाण
पत्र देण्यात आले, द्वितीय क्र. वृशाली मढवी यांनी पटकाविले. त्यांना 3000, रोख, स्मृती चिन्ह, रौप्य पदक व प्रमाण पत्र
देण्यात आले, तृतीय क्र. जास्मिन कुंदन रावते; यांनी पटकाविले. त्यांना 2000, रोख, स्मृती चिन्ह, कास्य पदक व प्रमाण पत्र
देण्यात आले.
19 पुढील खुला गट (महिला) प्रथम क्र. मधूबाला यांनी पटकाविले. त्यांना रोख रक्कम 10000, स्मृती चिन्ह, सुवर्ण पदक
व प्रमाण पत्र देण्यात आले, द्वितीय क्र. जयश्री बोराडे, यांनी पटकाविले. त्यांना 5000, रोख, स्मृती चिन्ह, रौप्य पदक व प्रमाण
पत्र देण्यात आले, तृतीय क्र. स्वराली लिंबकर; यांनी पटकाविले. त्यांना 3000, रोख, स्मृती चिन्ह, कास्य पदक, प्रमाण पत्र
देण्यात आले.
19 पुढील खुला गट (पुरुष) प्रथम क्र. रविंद्र आनंदा गायकर यांनी पटकाविले. त्यांना रोख रक्कम 10000, स्मृती चिन्ह,
सुवर्ण पदक व प्रमाण पत्र देण्यात आले, द्वितीय क्र. लक्ष्मण रामचंद्र मालुसरे यांनी पटकाविले. त्यांना 5000, रोख, स्मृती चिन्ह,
रौप्य पदक व प्रमाण पत्र देण्यात आले, तृतीय क्र. अजय सिंग; यांनी पटकाविले. त्यांना 3000, रोख, स्मृती चिन्ह, कास्य
पदक व प्रमाण पत्र देण्यात आले.
मॅरेथॉनच्या यशस्वीतेसाठी अशिष सावंत, जितेंद्र लिंबकर, शरद वाबळे, ऍकेडेमीचे उपाध्यक्ष संजय सकपाळ, प्रदिप चित्रे,
ज्ञानेश्वर ठोंबरे, दशरथ सांगळे, हेमंत भावे, राज काळे, टी दर्शन, समीर खैरे यांच्यासह अनेकांनी परिश्रम घेतले.
ज्ञानेश्वर ठोंबरे, (अध्यक्ष - प्रसिद्धी समिती), संपर्क ः महेंद्र चेंबूरकर 7208118843
For More Details Visit Our Blog http://ChemburMahaMarathon.blogspot.com/
No comments:
Post a Comment